cognitive disorder
समझा आपण एक काळ्या रंगाचा चश्मा घातलाय . जेव्हा आपण तो काळा रंगाचा चश्मा घालून दुनियेला बघतो, आपल्याला दुनिया आणि त्याच्यातले रंग सुद्धा थोडे काळपटच दिसतात . तसेच असतं ह्या distortions चं पण. जेव्हा आपण distortions चा काळा चश्मा घातलेला असतो आपल्याला जग आणि वास्तविकता थोडी काळपटच दिसते. रंग साफ दिसत नाहीत . पण आपली दृष्टी तर आपल्याला तेच दाखवतीये . मग आपल्याला कुणीही कितीही सांगितलं तरी त्यांच्या दृष्टिकोणने जगाला बघणे अवघड होऊन जाते इथे . एक गोष्ट notice केलीत ? बदल दृष्टी मध्ये नाही तर दृष्टिकोणा मध्ये आणायचाय . आपला दृष्टिकोण आपली दृष्टि व विचारांचा समावेश असतो . म्हणून जर आपल्याला दृष्टिकोण बदलायचा असेल तर आपल्या विचारांवर व आपल्या भावनेंवर लक्ष्य देणे गरजेचे होऊन जाते . ह्या गोष्टीमध्ये therapists , counselors व अनेक mental health professionals आपली सहायता करतात व इथून पुढे आपल्याला ते स्वतः करता येईल याच्यासाठी मार्गही दाखवतात .
पण हे distortions नेमके घडतात कसे . ? तर ते आपल्या अनुभवांने . आपले अनुभावांचा आपला दृष्टिकोण घडवण्यामध्ये खूप मोठा हात असतो. हे अनुभव कधी सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक. आपण आपल्या अनुभावआना कसे घेतो, त्यांना कुठल्या दृष्टीकोनाने बघतो व त्याच्यातून काय शिकवण घेतो, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या विचारांवर व दृष्टिकोनावर भर पडते. तर असे नाही की distortions ने उमडून आलेले विचार चुकीचे आहेत किंवा ते यायलाच नाही हवेत, कारण ते आहेत तर त्याच्या मागे करणे ही आहेतच. फक्त ते विचार जे तेव्हा आपल्या मदतीचे वाटत होते, ते आता व इथून पुढे आपल्याला किती मदत देतायत, ह्या गोष्टीकडे नजर देणे महत्वाचे आहे.
यापैकी काही distortions आहेत
Black and white thinking: ह्याला all or nothing thinking kinva polarised thining असे ही म्हणतात. ह्या मध्ये माणसाचे विचार खूप extremes मध्ये असतात. हे नाही तर ते, ते नाही तर हे, सगळ नाही तर काहीच नाही, जिंकणे किंवा हरणे. उदाहरणार्थ: जर एखादा माणूस परीक्षेत दुसरा आला, तरबतो ह्या गोष्टींची खुशी की तो दुसरा आला आहे इक्या लोकांमध्ये कमी असते आणि ह्या गोष्टीच दुःख जास्त की तो पहिला नाही आला. त्याच्या हिशोबाने दुसरा येणे म्हणजे सुध्दा नापास हिंग सारखे आहे.
Labelling: ह्याच्यामध्ये आपण आपल्या चुकांना आपल्या वागणुकीला, आपण कसे आहोत त्याच्या बरोबर अश्या प्रकारे जोडतो की जेव्हा पण आपल्या हातून कोणतीही चूक घडते आपण स्वतःवर लेबल्स लावतो. उदाहरणार्थ "माझ्या हातून ही चूक झाली, मी मूर्खच आहे किंवा मी बुद्धूच आहे". असे केल्याने आपल्याला कोणतीही गोष्ट करायला भीती वाटू लागते आणि चूक ही शिकण्याची पायरी नव्हे तर फुलस्टॉप वाटू लागते.
Overgeneralization: ह्याला आपण अतिससामान्यकरण सुध्दा बोलतो. ह्याच्या मध्ये आपण एखाद्या गोष्टीला उदाहरणार्थ ठेवून बाकी सगळ्या गोष्टींबद्दल नकारात्मक अंदाजे बनवतो. फॉर eg., मी ह्या परीक्षेत नापास झालो, मला काहीच येत नाही. एका प्रसंगाला घेऊन आपण हा नकारात्मक अंदाज बनवला की आपल्याला काहीच येत नाही.
Comments
Post a Comment